प्राजक्त चव्हाण यांनी घेतली मुंबई येथे खा. नारायण राणे यांची भेट


मुंबई : श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मुंबई येथे जाऊन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग मधील कामगार यांच्या प्रश्नांविषयी व सिंधुदुर्गमध्ये कामगार भवन व्हावे या प्रमुख मागणीसाठी भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कामगार यांच्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंधुदुर्ग मध्ये कामगार भवन लवकरच उभारण्यात यावे अशी आग्रही मागणी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी केली. या भेटी समवेत ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश सुसविरकर सोबत होते. कामगारांच्या अनेक अडीअडचणी प्रलंबित आहेत त्या सोडविण्यासाठी सुसंवाद साधला व शुभेच्छा दिल्या. या चर्चेमध्ये खा. राणे यांनी याविषयी मी कामगार मंत्र्यांशी बोलून जिल्ह्याच्या विकासासाठी, कामगार वर्गासाठी चे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे सांगीतले.

error: Content is protected !!