चित्रकार केदार टेंबकर यांनी वाहिली मनमोहन सिंह यांना अनोखी श्रद्धांजली

कुडाळ : भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना कुडाळ सरंबळ येथील केदार टेमकर याने अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. या कलाकाराने आपल्या कलेतून 2 सेंटीमीटर आकाराच्या एक रुपयाच्या नाण्यावर ॲक्रेलिक रंगाच्या साह्याने व्यक्तिचित्र साकारले आहे.

गुरुवार दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाले. त्यांना अनेकांनी आपापल्या परीने श्रद्धांजली वाहिली. कुडाळ येथील चित्रकार केदार टेंबकर याने त्यांचे चित्र साकारत त्यांना आपल्या कलेतून श्रद्धांजली वाहिली.

error: Content is protected !!