सहा पक्षांकडून किती उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
कुडाळ प्रतिनिधी: आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे महायुती व महविकास आघाडी मधून या वादळी निवडणुकीत कोण उतरणार या बाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्कंठा लागून होती. अखेर आज शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले नाहीत . महाविकास आघाडी व महायुतीने आज दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच ठेवलं होतं. अखेरपर्यंत महायुतीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही,
काय आहे मविआचा फॉर्म्युला?
अशीच स्थिती महाविकास आघाडीची देखील आहे. मविआ नेत्यांनी ८५ – ८५ – ८५ असा फॉर्म्युला सांगितला होता खरा, मात्र काँग्रेसने १०० हून अधिक उमेदवार जाहीर केले. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील ८५ हून अधिक उमेदवार जाहीर केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील ८५ पेक्षा जास्त जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे मविआचा नेमका जागावाटपाचा फॉर्म्युला काय होता हे काही समजू शकलेलं नाही.
जागा वाटप फॉर्म्युला मध्ये गोंधळ
दोन्ही बाजूच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलात गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये मविआचे दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर, चार मतदारसंघात महायुतीच्या दोन पक्षांचे उमेदवार दोस्तीत कुस्ती करताना दिसणार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यामुळे, काही उमेदवार माघार घेऊ शकतात आणि हे चित्र बदलू शकतं.
महायुतीचा जागावाटपाचा गोंधळ
महायुती देखील जागा वाटपांवरून गोंधळ उडालेला दिसत आहे.महायुतीत भारतीय जनता पार्टीला १५२ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी १४८ जागांवर त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर, चार जागांवर त्यांच्या मित्रपक्षांचे उमेदवार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८० जागा मिळाल्या असून त्यांनी दोन जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत.
आ.वैभव नाईक निष्क्रिय आमदार: योगेश घाडी
अजित पवारांनी ५३ उमेदवार जाहीर केले आहेत.. महायुतीने एकूण २८३ जागांवर २८५ उमेदवार जाहीर केले आहेत. दोन मतदारसंघात महायुतीचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. तर पाच मतदारसंघांमध्ये महायुतीने उमेदवार दिले आहेत की नाही हे कळू शकलेलं नाही. मालेगाव मध्य मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही.
मविआचा १० जागांवर कोणाची नावे? कोण उतरणार रिंगणात!
महायुती मधे जागा वाटपावरून जी स्थिती आहे, अशीच काहीशी स्थिती मविआ मध्येही पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपातही सावळागोंधळ पाहायला मिळाला. मविआच्या जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. कारण त्यांनी राज्यात तब्बल १०४ उमेदवार दिले आहेत. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ८७ उमेदवार दिले आहेत. मविआने राज्यातील एकूण २७७ जागांवर २८१ उमेदवार दिले आहेत.
मालवण तालुक्यात शिवसेनेला धक्का!
चार मतदारसंघांमध्ये मविआचेच दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इतर १० मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार दिले आहेत की नाही, किंवा या जागांवर त्यांच्या मित्रपक्षांचा उमेदवार आहे का? हे कळू शकलेलं नाही.