आ.वैभव नाईक निष्क्रिय आमदार:योगेश घाडी

भडगाव धरण आणि वैभव नाईक यांचा परस्पर काही संबंध नाही.

प्रचारपत्रकातून खोटा प्रचार थांबवावा, हिंमत असेल तर तुम्ही पत्रव्यवहार जाहीर करा

कुडाळ प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सद्ध्या आ.वैभव नाईक यांच्यावर बोचऱ्या टीकांचा मारा होताना दिसत आहे. यातूनच आता योगेश घाडी यांनी वैभव नाईक यांच्या विकासकामांचा ? पाढा वाचून त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

योगश घाडी म्हणालेत, वैभव नाईक यांनी निवडणूक प्रचारपत्रकात आंगणेवाडी,भडगाव, आंब्रड, घोटगे येथील धरणांच्या कामांना आपल्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली व कामांना सुरुवात झाली अश्या आशयाची पत्रके छापली आहेत मात्र प्रत्यक्षात या कुठल्याही धरण प्रकल्पांशी आमदार वैभव नाईक यांचा काहीही संबंध नसल्याची टीका योगेश घाडी यांनी केली. ते पुढे म्हणाले,भडगाव धरणाच्या संदर्भात सण १९९७ पासुन स्थानिक ग्रामस्थ स्वतः पाठपुरावा करत आहेत. सण १९९८ सलीबसुरेश प्रभू खासदार असताना पहिल्यांदा या धरणाचा स्थळ पाहणी अहवाल शासनाला सादर झाला तर २००६ साली नारायणराव राणे पालकमंत्री असतेवेळी या धरणासाठी माती परीक्षण झालं. नंतरच्या काळात प्रशासकीय मान्यता होऊनही रखडलेल धरणाचं काम महायुतीच सरकार आल्यानंतर सुरू झाल त्यामुळे या धरण प्रकल्पाशी आमदार वैभव नाईक यांचा काहीही संबंध नाही,

वैभव नाईक निष्क्रिय आमदार

यावेळी पुढे योगेश घाडी म्हणाले जर आ.वैभव नाईक यांचा संबंध असेल तर त्यांनी त्या धरणासाठी काय पत्रव्यवहार केला हे जाहीर करा अस आवाहन योगेश यांनी केलं आहे.वैभव नाईक यांच्यासारखा निष्क्रिय आमदार असल्याने काम सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी आद्यप भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. निलेश राणे साहेब आमदार झाल्यानंतर शेतकऱ्यांची सर्व प्रलंबित नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याचीही योगेश घाडी यांनी दिली.

निलेश राणेंचा समजूतदारपणा कळण्या एवढा शहाणपणा उबाठ कार्यकर्त्यांमध्ये नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *