केसरकरांना ड्रायव्हर ठेवण्याची भाषा बोलणाऱ्यांवरच त्यांचे चालक होण्याची वेळ…

वैभव नाईक; राणेंची कणकवलीतील ओळख संपवायला हवी…

कणकवली, ता. २९ : काही वर्षापूर्वी दीपक केसरकर यांना ड्रायव्हर म्हणून ठेवणार असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले होते. मात्र आज त्याच राणेंना केसरकर यांच्या वाहनावर चालक होण्याची वेळ आली अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. तसेच कणकवली आणि कुडाळ मतदारसंघ एवढीच राणेंची ओळख राहिली आहे. ती देखील आपण संपवूया असे आवाहन त्यांनी केले.

कणकवलीतील संदेश पारकर यांच्या प्रचार सभेत श्री. नाईक बोलत होते. ते म्हणाले, राज्याचे, देशाचे नेते म्हणून मिरवणाऱ्या नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना कणकवली आणि कुडाळ मतदारसंघा व्यतिरिक्त ओळख नाही. या निवडणुकीत राणेंची ही ओळख देखील अापण संपवूया.

नाईक म्हणाले, काल कुडाळमध्ये आपल्या मोठ्या मुलाचा उमेदवारी अर्ज भरताना नारायण राणे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. महामार्गावर वागदे येथे आल्यानंतर त्यांनी धनुष्यबाण टाकला आणि कमळ हातात घेतले अशी राणेंची हतबलता आहे. राणेंनी अापल्या संपूर्ण प्रॉपर्टीची विभागानी दोन मुलांमध्ये केली आहे. त्यासाठी त्यांना एक कणकवलीत तर एका मुलाला कुडाळमधून आमदार करायचंय. पण आपण ही सर्व घराणेशाही संपवून टाकूया.

error: Content is protected !!