हरकुळ बुद्रुक : हरकुळ बुद्रुक गावातील भटवाडी ते दिर्बादेवी या मार्गावरील गेल्या ४ वर्षांपासून रखडलेले ११ के वी चे काम अखेर पूर्ण झाले आहे. या कामामुळे भटवाड़ी, जंगमवाडी, सोनारवाड़ी, देऊलवाड़ी, गावठनवाड़ी, व्हावटवाडी, भाटदूकान, शेखवाड़ी खड़कवाड़ी परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित आणि उज्ज्वल प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या रखडलेल्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज़िल्हा परिषद सदस्य सन्मा; मनोज रावराणे साहेब,भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सन्मा: इम्रान शेख , तनटामुक्ति अध्यक्ष सन्मा: राजू पेड़नकर, निलेश तेली, व भा.ज. पा अल्पसंख्यांक तालुका सचिव सरफराज़ शेख यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ग्रामस्थांनी या कामासाठी सहकार्य करणारे संबंधित MSCB चे section अधिकारी तावड़े साहेब व कर्मचारी रूपेश दाभोलकर व पूर्ण टीम चे सर्वांचे आभार व्यक्त करत गावाच्या विकासासाठी अशाच प्रकारे प्रलंबित कामेही लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.