कणकवली : कणकवली तालुक्यातील शिरवल गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित ग्रामसभेत समितीच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेच्या माध्यमातून श्री. सुभाष सिताराम पाताडे यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी, माजी सैनिक, वकील, पत्रकार, निवृत्त पोलीस अधिकारी, व्यापारी, महिला बचत गट, मागासवर्गीय, विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामसेवक, तलाठी तसेच गावातील प्रभावी व्यक्तींचा समितीत समावेश करण्यात आला.
यामध्ये श्रीम. गौरी गुरुप्रसाद वंजारे (सरपंच), श्री. प्रवीण दत्तराम तांबे (उपसरपंच), श्री. सुशील गौतम तांबे (पोलीस पाटील), श्री. गुरुनाथ हनुमंत मेस्त्री (ग्रामीण शिक्षण समिती), श्री. आनंद रामचंद्र पेडणेकर (माजी सैनिक प्रतिनिधी), श्री. कृष्ण अंकुश चव्हाण (वकील प्रतिनिधी), श्री. तुळशीदास कृष्णा कुडतरकर (पत्रकार प्रतिनिधी), श्री. दत्ताराम नारायण प्रभूपाटकर (निवृत्त पोलीस अधिकारी), श्री. लवू विठ्ठल सातवसे (व्यापारी प्रतिनिधी), श्रीम. रसिका राजेश शिरवलकर (महिला बचत गट प्रतिनिधी), श्री. रविकांत पांगो तांबे (मागासवर्गीय प्रतिनिधी), कु. अवंतिका कृष्णा कासले (विद्यार्थी प्रतिनिधी), श्री. सुशील हरिश्चंद्र गोसावी (प्राथमिक शाळा अध्यापक प्रतिनिधी), श्री. लॅन्सन मॅक्सी फर्नांडिस (वीज वितरण प्रतिनिधी), श्री. सुनील वेंगुर्लेकर (बीट अंमलदार), श्रीम. श्रद्धा अनंत कोरगावकर (तलाठी), श्री. अमोल बाबाजी सावंत (गावातील इतर प्रभावी व्यक्ती) व गावातील इतर प्रभावी व्यक्तींमध्ये श्री. अजित शांताराम सावंत, श्री. मनोज लवू राणे, श्री. महेश जनार्दन शिरवलकर, श्री. रविकांत यशवंत सावंत, श्री. राजेंद्र शांताराम चव्हाण, श्रीम, प्रज्ञा महेश मेस्त्री यांचा समावेश आहे.
नव्या समितीच्या माध्यमातून गावातील किरकोळ वाद, कौटुंबिक तसेच सामाजिक स्वरूपाचे तंटे आपसातील संवाद, समन्वय आणि सामोपचाराच्या माध्यमातून सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. गावात शांतता, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ग्रामसभेत समितीच्या नवनियुक्त अध्यक्षांसह सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिरवल गाव तंटामुक्त ठेवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी समितीला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले असून सलग तीन वर्ष अध्यक्ष म्हणून सुभाष सिताराम पाताडे यांची बिनविरोध निवड झाल्याने सुभाष पाताडे यांचा विशेष गौरव प्रसंगी करण्यात आला.


Subscribe









