कुडाळ शहरात मोकाट जनावरांचा गणेश चतुर्थीत तात्काळ बंदोबस्त करा

छोट्या भाजी विक्रेत्यांचे आगामी गणेशोत्सवाच्या काळात नुकसान रोखण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांची कुडाळ मुख्याधिकारी खंडू पोवळ यांच्याकडे मागणी

कुडाळ : हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण असलेला श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणाच्या काळात कुडाळ बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची आणि वाहनांची प्रचंड गर्दी होते. मात्र, सध्या कुडाळ शहरामध्ये मोकाट जनावरांचा (गुरे-वासरे) सुळसुळाट झाला असून, यामुळे शहरात गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना र्नगरसेवक श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पोवळ साहेब यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.या

निवेदनात प्रामुख्याने खालील गंभीर मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे:

गरीब व्यापाऱ्यांचे नुकसान : बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला बसणारे गरीब भाजीपाले विक्रेते आणि फळ विक्रेते यांच्या दुकानातील भाजी व साहित्य ही मोकाट जनावरे खाऊन नष्ट करत आहेत. आधीच सणासुदीच्या काळात पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या या गरीब व्यापाऱ्यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

वाहतूक कोंडी (Traffic Jam): मुख्य रस्ते आणि चौकाचौकांमध्ये ही जनावरे ठाण मांडून बसतात. गणेशोत्सवा दरम्यान वाहनांची संख्या दुप्पट होणार असल्याने, या जनावरांमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

युवासेनेची नम्र विनंती व मागणी : गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आणि व्यापारी व नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी नगरपंचायतीने तात्काळ पावले उचलावीत. या मोकाट जनावरांना पकडून त्यांची योग्य कोंडवाड्यात किंवा गोशाळेत सोय करावी, जेणेकरून सणादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. प्रशासनाने या लोकहितार्थ मागणीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मंदार शिरसाट व युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाठ,अमित राणे ,संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर उपस्तीत होते.

error: Content is protected !!