कुडाळ  नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील मोकाट जनावरांना  रिफ्लेक्शन पट्टे

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील मोकाट जनावरांना  रिफ्लेक्शन पट्टे बांधण्यात आले. हे पट्टे चांगल्या दर्जाचे असून काळोखात लांबून देखील स्पष्ट दिसल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास वाहनचालकांना निश्चितच मदत होणार आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

ही जनावरे अनेकदा रात्रीच्या वेळी रस्त्यांवर मोकाट फिरत असतात. वाहनचालकांना या जनावरांचा अंदाज न आल्याने  अपघात   वाहनचालकांसह जनावरांना दुखापत होण्याची  शक्यता  असते. शिवाय गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून अनेक मुंबईकर  चाकरमानी गणेश चतुर्थी निमित्त मुंबईहून गावी येतात. त्यामुळे या कालावधीत वाहनांची संख्या नेहमी जास्त असते. या दृष्टीने कुडाळ नगरपंचायतच्या हा माध्यमातून महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी या पट्ट्यांवर वाहनांचा प्रकाश पडल्यामुळे हे पट्टे  दुरूनच चमकतात आणि वाहन चालकांना जनावरांचा अंदाज येतो. त्यामुळे वाहनचालक सावध होऊन संभाव्य अपघात टाळता येतो.

जनावरांसह वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असून कुडाळ नगरपंचायत च्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!