श्री देव वेतोबा मंदिर आजगाव येथे श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्य परिवार आयोजित गुरुवंदना संगीत सोहळा उत्साहात संपन्न.

संगीत अलंकार सौ वीणा दळवी संचलित श्री राधाकृष्ण संगीत साधना या संगीत विद्यालयाच्या शिष्य परिवाराच्या वतीने रविवार दि ३० ऑगस्ट रोजी श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगाव येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध गायक, किर्तनकार, प्रा. डॉ. श्रीराम दिक्षित यांचे शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचे मालक श्री सोनू उर्फ बाबल नाईक, देवस्थानचे प्रमुख मानकरी श्री दादा प्रभू आजगावकर, आरवली टाक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा नाईक-तांडेल मॅडम, सुप्रसिद्ध तबलावादक प्रसाद मेस्त्री तसेच, श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या संचालिका संगीत अलंकार सौ वीणा दळवी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी गुरु-शिष्य नाते, संगीत परंपरा याविषयी विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या आजगाव, तळवडे, सावंतवाडी, कुडाळ, डेगवे या सर्व शाखांचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून त्या माध्यमातून गुरूंना अभिवादन केले. संगीत व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे अध्यक्ष कोयनारत्न श्री राजाराम बुवा शेलार, भजनसम्राट भालचंद्र केळुस्कर बुवा, दशावतारी कलावंत नारायण आसयेकर, बुवा दत्तप्रसाद स्वार, बुवा नंदू पवार, उद्योजक अण्णा झांट्ये आदि अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले तसेच श्री राधाकृष्ण संगीत साधना विद्यालयाला व विद्यालयाच्या संचालिका सौ वीणा दळवी मॅडम यांना शुभेच्छा दिल्यात. स्वयंभू मित्रमंडळाचे कार्यकर्ते श्री गजा पांढरे, श्री अविनाश रायशिरोडकर, त्यांचे सहकारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

error: Content is protected !!