आमदार दीपक केसरकर यांचा मुंबईत कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी केक कापून आपल्या कुटुंबीयांसोबत जन्मदिवसाचा आनंद साजरा केला. या घरगुती कौटुंबिक सोहळ्याला त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, नातू अर्जुन आणि इतर कौटुंबिक सदस्य उपस्थित होते, त्यांनी आमदार केसरकर यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दुसरीकडे, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या संपूर्ण मतदारसंघात विविध सामाजिक आणि कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून मतदारसंघात समाजोपयोगी उपक्रम राबवून हा दिवस साजरा केला जात असतानाच, मुंबईत मात्र केसरकर कुटुंबीयांनी घरगुती वातावरणात एकत्र येत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!