एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण; कणकवलीत संदेश पारकर यांच्या हस्ते उपक्रम

एसटीच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवली एसटी कार्यशाळेत वृक्षारोपण

कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८व्या वर्धापन दिनानिमित्त एसटी कार्यशाळांच्या वतीने मंगळवारी (दि. १४) राज्यभर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली एसटी कार्यशाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी नगरसेवक संकेत नाईक, अवधूत मालंडकर, काशिनाथ मेस्त्री, सचिन सावंत, अजित सावंत, रामदास मांजरेकर, कृष्णा केणी, दर्शन सावंत, फ्रँकी लोगो आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास कणकवली विभाग नियंत्रक दीपक धोंडिबा घोडे, यंत्र अभियंता (चालन) पांडुरंग वाघमोडे, विभागीय भांडार अधिकारी संजय बंगडे, विभागीय लेखा अधिकारी सुवर्णा दळवी (शिंदे), सहायक यंत्र अभियंता मृदुला जाधव, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) निलेश लाड, विभागीय अभियंता (स्थापत्य) अक्षय केकरे, कनिष्ठ अभियंता तारळेकर, इमारत निरीक्षक स्नेहल मुंज, वाहतूक पर्यवेक्षक राकेश शिंदे तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण १,२५०, विभागीय कार्यालयात १००, विभागीय कार्यशाळेत १५० आणि कणकवली आगारात १४० अशा विविध ठिकाणी सुरंगी, खैर आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी एसटी प्रशासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

error: Content is protected !!