वाल्मिकी फाऊंडेशन ,रोटरी क्लब सिकंदराबाद व रोटरी क्लब कुडाळ यांचा विंग्ज ऑफ होप अभिनव उपक्रम
बेंगलोर ते चिपी अनोखा विमान प्रवास; निराधार मुलांचा अनोखा आनंद
कुडाळ/ प्रतिनिधी
विंग्स ऑफ होप उपक्रमा अंतर्गत वाल्मिकी फाउंडेशन सिकंदराबाद, रोटरी क्लब ऑफ सिकंदराबाद व रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या माध्यमातून २० निराधार मुलांना आयुष्यातील पहिला विमान प्रवासासह कोकणची सफर करविण्यात आली, बेंगलोर ते चिपी अनोखा विमान प्रवासामुळे निराधार मुलांच्या चेह-यावर अनोखा आनंद पहावयास मिळाला.
यावेळी सिकंदराबादच्या वाल्मिकी फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी असिस्टंट गव्हर्नर रो. वाल्मिकी हरिकिशन, असिस्टंट गव्हर्नर संजय रावराणे,रोटरी क्लब ऑफ सिकंदराबादचे अध्यक्ष मोहन रायडू,रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष मकरंद नाईक,सचिव राकेश म्हाडदळकर,खजिनदार डाॅ जयश्री केसरे,माजी असिस्टंट गव्हर्नर गजानन कांदळगावकर व सचिन मदने,रविंद्र परब ,संजय पिंगुळकर,राजेंद्र केसरकर,आनंद वेंगुर्लेकर,नीता गोवेकर,सेवानिवृत्त शिक्षिका सौ अस्मिता परब ,सौ मनाली नाईक आदी उपस्थित होते.
चिपी सिंधुदुर्ग विमानतळावर जंगी स्वागत
दुपारी ३ वाजता हैद्राबाद येथून विमानाने सदर निराधार 20 मुले चीपी विमानतळावर संध्याकाळी ५ वाजता दाखल झाली. रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून सदर मुलांचे चीपी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी श्री गजानन कांदळगावकर. आनंद वेंगुर्लेकर, सेक्रेटरी राकेश म्हाडदळकर, खजिनदार डाॅ जयश्री केसरे उपस्थित होते.
डाॅ जयश्री केसरेकडून निराधार मुलांना अनोखी भेट
खास कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आयत्यावेळी श्री वाल्मिकी फाउंडेशन चे अध्यक्ष व माजी असिस्टंट गव्हर्नर रो. वाल्मिकी किसन यांचा संदेश आला की विमानामध्ये मुलांचा नाश्ता विमान कंपनी कडून रद्द करण्यात आला आहे तेव्हा तुम्ही जरा मुलांसाठी काहीतरी नाश्ता घेऊन या, अचानक आलेल्या या संदेशामुळे आमची थोडी धावपळ झाली पण खजिनदार रो डॉ जयश्री केसरे यांनी अर्जंट खूप सुंदर नाश्ता ची फूड पॅकेट तयार करून घेतली त्यात, २ समोसे केक, स्वीट चा समावेश होता.खूप फास्ट त्यांनी समयसूचकता दाखवत त्यांनी उत्कृष्ट नाश्त्याची सोय केली.
बॅ.नाथ पै कडून विशेष बससेवा
20 निराधार मुलांना बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्कूल बसने कुडाळ पिंगुळी येथील पद्मश्री श्री परशुराम गंगावणे यांच्या ठाकूर आदिवासी कला अंगण येथे आणण्यात आले.या उपक्रमात बॅ नाथ पै संस्थेचा अनोखा सहभाग.
पिंगुळी आदिवासी ठाकर कलाकेंद्र भेट
पद्मश्री पुरस्कार विजेते श्री परशुराम गंगावणे यांनी आम्हा सर्वांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मग सर्व मुलांना त्यांचे म्युझियम दाखविण्यात आले , मग सदर मुलांना रामायणातील श्री राम सीता स्वयंवर हा भाग पपेट शो मध्ये दाखविण्यात आला. कोकणातील ठाकर आदिवी कला जवळून अनुभवण्याची संधी 20 निराधार मुलांना या उपक्रमातून अनुभवयास मिळाली.

हाॅटेल स्पाईस कोकणची विशेष सहभाग
रोटरी क्लब आऑफ कुडाळचे सचिव राकेश म्हाडदळकर यांच्या हाॅटेल स्पाईस कोकण वर आलो सर्व मुलांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
कॉन्फरन्स हॉल मध्ये 20 निराधार मुलांना एकत्र करण्यात आले तेथे कुडाळ आवळेगावच्या कलाकार्यानुभवच्या उत्कृष्ट सेवानिवृत्त शिक्षिका सौ अस्मिता परब मॅडम यांनी सर्व 20 निराधार मुलांना कागदापासून विविध आकर्षक फुले व बुके तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेला निराधार मुलांचा उस्फुर्त सहभाग मिळाला.सदर मुलांना रोटरी क्लब कुडाळचे माजी अध्यक्ष राजेंद केसरकर यांच्या मार्फत आपल्या क्लबची आठवण म्हणून खाऊ चे बाॅक्स देण्यात आले. विशेष महत्त्वाचे म्हणजे सदर मुलांची राहणे , जेवण, व सकाळी नाश्ता याची सर्व व्यवस्था रोटरी क्लब कुडाळचे सचिव राकेश म्हाडदळकर यांच्या हॉटेल स्पाईस कोकण येथे करण्यात आली.
श्री गजानन कांदळगावकर व उमेश गाळवणकर यांच्या मार्फत सदर मुलांची बसमधून एअरपोर्टवरून ने आणण्याची व्यवस्था करण्यात आली.
रात्रीचे स्नेहभोजनावेळी या पाहुण्या निराधार मुलांच्या चेहऱ्यावर जे समाधानाचे भाव होते त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही

वाल्मिकी फाऊंडेशन सिकंदराबादकडून पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा विशेष सन्मान
विंग्ज ऑफ होप निमित्त वाल्मिकी फाऊंडेशन सिकंदराबाद ,रोटरी क्लब ऑफ सिकंदराबाद यांचेवतीने माजी असिस्टंट गव्हर्नर डाॅ वाल्मिकी हरिकिशन यांचेहस्ते कुडाळ पिंगुळी येथील आदिवासी ठाकर कला केंद्राचे संस्थापक पद्मश्री परशुराम गंगावणे व रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष मकरंद नाईक यांचा शाल ,सन्मानचिन्ह देवून विशेष सन्मान करण्यात आला.
खरंच खूप सुंदर आणि मनाला समाधान देणारा व माणुसकी जपणारा उपक्रम वाल्मिकी फाऊंडेशन ,रोटरी क्लब ऑफ सिकंदराबाद ,रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांनी राबविल्याबाबत जनमाणसात विशेष कौतुक होत आहे.
विशेष आभार
या उपक्रमासाठी गजानन कांदागावकर ,रवींद्र परब, नीता गोवेकर मॅडम, आनंद वेंगुर्लेकर, डॉक्टर जयश्री केसरे, राकेश म्हाडदळकर, राजू केसरकर,सचिन मदने सर ,बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश जी गाळणकर, रीलस्टार आकाश भोगटे, तसेच इतर सर्व रोटरी सदस्यांचे कुडाळ रोटरी अध्यक्ष मकरंद नाईक यांनी विशेष आभार व्यक्त केले.




Subscribe










