नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

जनता, कार्यकर्ते यांचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे – संदेश पारकर

जनसेवेचे व्रत अखंडपणे जोपासणार

कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातील संदेशप्रेमींची मंगळवारी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या सुमारास पारकर यांच्या कणकवली -बाजारपेठ येथील निवासस्थानी कायकर्ते, नागरिक, संदेशप्रेमी यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी येथील कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले, तेथेही जिल्हाभरातील नागरिकांनी उपस्थित राहून पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संदेश पारकर म्हणाले, जनता, कार्यकर्ते यांचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे. जनतेच्या आग्रह, प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा कणकवलीचा नगराध्यक्ष झालो आहे. मी खासदार, आमदार व्हायला पाहीजे, ही जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, जनसेवेचे व्रत सदैव तेवत ठेवणार असल्याचे संदेश पारकर म्हणाले.

यावेळी एचपीसीएल सभागृहात पारकर यांनी वाढदिवसानिमित्त केक कापला खासदार, आमदार व्हायला पाहीजे, ही जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, जनसेवेचे व्रत सदैव तेवत ठेवणार असल्याचे संदेश पारकर म्हणाले.

यावेळी एचपीसीएल सभागृहात पारकर यांनी वाढदिवसानिमित्त केक कापला. यावेळी माजी आमदार विजय सावंत, प्रा. दिवाकर मुरकर, निवृत्त शिक्षक डी. पी. तानावडे, उबाठा शिवसेना महिला आघाडीप्रमुख सौ. नीलम सावंत – पालव, कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, दीपिका जाधव, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, लुकेश कांबळे, माजी नगरसेवक उमेश वाळके, विलास कोरगांवकर, भाई परब, कसाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर, शीतल मांजरेकर, राजन पारकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!