रक्तदान करणे ही केवळ एक सामाजिक सेवा नसून ‘काळाची गरज आणि राष्ट्रीय कर्तव्य’ आहे – संदेश पारकर

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली महाविद्यालयात ‘कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ’ भव्य रक्तदान शिबिर संपन्न;

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली : औषधे आणि वैद्यकीय उपकरणे कारखान्यात तयार होऊ शकतात, पण रक्त केवळ माणसाच्या शरीरातच तयार होऊ शकते. विज्ञानाने रक्ताला कोणताही पर्याय शोधलेला नाही. त्यामुळे स्वतःहून पुढे येऊन रक्तदान करणे ही केवळ एक सामाजिक सेवा नसून ‘काळाची गरज आणि राष्ट्रीय कर्तव्य’ आहे.असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

ते कणकवली महाविद्यालयात ‘कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ’ भव्य रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पारकर यांनी कै.सुबोध टिकले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विजय सावंत, डॉ.अनंत नागवेकर,शिवसेना महिला जिल्हाप्रमुख निलम सावंत पालव,माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर,उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक बाळू पारकर, संकेत नाईक,लुकेश कांबळे, रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, नगरसेविका जाई मुरकर,दिपा सुमेधा अंधारी, माजी नगरसेवक विलास कोरगावकर,दिवाकर मुरकर, माजी नगरसेवक भाई परब, युवा नेते सौरभ पारकर, सुनिल पारकर, कौशिक पारकर,सुनिल हरमळकर,संतोष पुजारे ,सी.आर.चव्हाण, दिव्या साळगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी संदेश पारकर पुढे बोलताना म्हणाले की,माझे कार्यकर्ते मित्रपरिवार यांच्या प्रेमामुळेच मला उर्जा मिळते.माझे मित्र कै.सुबोध टिकले हे सेवाभावी व्यक्तीमत्व होते.त्यांचे विचार जपणे हे आमचे कर्तव्य आहे.गेली 16 वर्षे रक्तदान शिबिराचे सातत्य ठेवून सामाजिक बांधिलकी जपत आहोत.
रक्तदान हा मानवतेचा सर्वोच्च दान मानला जातो कारण तो कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाला नवजीवन देऊ शकतो. रक्तदानामुळे अनेक जिवंत प्राण वाचतात आणि अनेक कुटुंबांमध्ये आनंद परत येतो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ भव्य ‘महारक्तदान शिबिरा’चे आयोजन कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल (HPCL) सभागृहात करण्यात आले. या शिबिरात ५०० रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता.नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गेल्या २० वर्षांहून अधिक काळ सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत.

गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

या महारक्तदान शिबिराला शहर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिराला कणकवलीकर नागरिक आणि तरुणांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!