भविष्यात आमदार, खासदार व्हा… राणेंनी दिल्या पारकर यांना शुभेच्छा
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या खास.नारायण राणेंशी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या
कणकवली : कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी भेट घेतली यावेळी खासदार नारायण राणे यांनी संदेश पारकर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नीलम राणे यांनी देखील संदेश पारकर यांना शुभेच्छा देत आशीर्वाद दिले.यावेळी खासदार राणेंनी भविष्यात आमदार, खासदार व्हा अशा शुभेच्छा देत आशीर्वाद दिलेत.यावेळी कणकवली शहरातील विकासकामांबाबत खासदार राणेंशी चर्चा केली.आणि निधीसाठी मागणी केली.यावेळी राणेंनी शहर विकास साठी निधी देऊ असे आश्वासीत केले.तसेच यावेळी “भावी खासदार संदेश पारकर”या बॅनरची पण चर्चा रंगली.
संदेश पारकर हे यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते. मात्र तूर्तास त्यांच्याकडे पक्षीय कोणतेही पद नसताना नगराध्यक्ष झाल्यानंतर पारकर यांचीही खासदार नारायण राणे यांच्याशी झालेली दुसरी भेट असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय घडामोडी येत्या काळात वेग घेण्याची देखील चर्चा सुरू झाली आहे.त्यामुळे खासदारांना भावी खासदार भेटल्याची चर्चा रंगली होती.


Subscribe










