जबरदस्तीचे स्मार्ट मीटर व आलेल्या वाढीव वीज विरोधात किनळोस ग्रामस्थांची महावितरणवर धडक

ओरोस उप कार्यकारी अभियंत्यांवर केला प्रश्नांचा भडीमार

किनळोस गावात जबरदस्तीने लावण्यात आलेले घरगुती स्मार्ट मीटर व कालांतराने आलेली भरमसाठ विज बिला विरोधात विनोद ग्रामस्थांनी एकजूट करून महावितरणच्या ओरोस येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. किनळोस ग्रामस्थ संजय सावंत, सखाराम परब, प्रकाश परब, रविकांत सावंत, मधुकर सावंत, बाळकृष्ण गावडे,अक्षय साटम, सदानंद ठुबरे, राजेंद्र सावंत, अमृत बागवे, वासुदेव सावंत यांसह सुमारे तीस ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या देत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. दरम्यान शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या मागण्या महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यांच्या तक्रारी निराकरण करणे संदर्भात लक्ष वेधले. वाढीव बिलान संदर्भात गावात वाढीव बिलासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत पुढील पंधरा दिवसात प्रत्येक कनेक्शन वर पाच दिवसांच्या कालावधीत वीज भार डाटा पडताळणी करून वाढीव बिले प्राप्त झाली असल्यास कमी करण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता श्री कामथे यांनी शिष्टमंडळाला दिले. याशिवाय ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार जीर्ण झालेले विद्युत पोल व विद्युत वाहिन्या देखील बदलण्याच्या सूचना पणदूर कनिष्ठ अभियंता पाटील यांना दिल्या.

error: Content is protected !!