चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ मिळवून देते – संदेश पारकर

कणकवली : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ मिळवून देते,” असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

ते कणकवली विद्यामंदिर हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी त्यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि नगरसेवक बाळू पारकर यांनी सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन केले

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहरविकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने शहर मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यामंदिर हायस्कूल चे मुख्याध्यापक टी.जे.कांबळे,नगरसेवक बाळू पारकर, नगरसेवक संकेत नाईक, शितल मांजरेकर,रामदास मांजरेकर, कलाशिक्षक आणि परीक्षक प्रसाद राणे, प्रथमेश गावकर यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पारकर म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या व्यासपीठामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होईल.आणि चांगले कलाकार घडतील.

यावेळी नगरसेवक संकेत नाईक म्हणाले की,संदेश पारकर यांचा वाढदिवस म्हणजे कणकवलीकरासांठी उत्सव असतो.संदेश पारकर हे स्वतः कलाप्रेमी व्यक्तिमत्त्व आहे.त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर विकास आघाडीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.विद्याथ्यांच्या कलागुणांना या स्पर्धेतून व्यासपीठ मिळेल आणि चित्रकला स्पर्धेतून भविष्यातील उत्तम कलाकार घडतील.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील सृजनशीलता वाढवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कलाशिक्षक प्रसाद राणे म्हणाले की,”चित्रकला स्पर्धेतून मुलांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख मिळतात आणि अशा व्यासपीठांमधूनच भविष्यातील उत्तम कलाकार घडतात.”

भव्य चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला .आपल्या मनातील भावना आणि विचार रंगांच्या माध्यमातून कागदावर उतरवण्यासाठी बालदोस्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.रंगांच्या दुनियेत विद्यार्थी दंग झाले होते.

स्पर्धेमध्ये वैविध्यपूर्ण विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वॉटर कलर, क्रेयॉन्स आणि ऑइल पेस्टल्सचा वापर करून अतिशय आकर्षक चित्रे रेखाटली. स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यासाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून कलाशिक्षक प्रसाद राणे, प्रथमेश गावकर यांनी काम पाहिले. आले.

. हि चित्रकला स्पर्धा चार गटांत आयोजित करण्यात आली.पहिला गट इयत्ता पहिली ते दुसरी, दुसरा गट तिसरी ते चौथी, तिसरा गट पाचवी ते सातवी आणि चौथा गट आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी.यावेळी ७०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.या स्पर्धेचे यशस्वी आयोजन शहर विकास आघाडीच्या वतीने शितल रामदास मांजरेकर यांनी केले होते.

प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ अशा एकूण पाच विजेत्यांची निवड करण्यात आली त्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात आले.तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले.या भव्य चित्रकला स्पर्धे
ला विद्यार्थ्यांचा आणि बालमित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पालक ही विद्यार्थ्यांसोबत मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!