
शिवसेना पक्ष महिलांचा मान सन्मान ठेवून नेतृत्व करण्याची संधी देईल-श्रेया परब
कुडाळमध्ये शिवसेना सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक संपन्न
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक आज कुडाळ एमआयडीसी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.यावेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब यांची प्रमुख उपस्थिती होती. वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांकडून महिला संघटनेचा आढावा घेतला.महिला पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे करून, महिलांच्या बैठका घेऊन, महिला संघटना वाढवावी. रिक्त असलेल्या पदांवर नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नावे सुचवा त्यांची निवड केली जाईल. तसेच महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवा,त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी संघर्ष करा त्यासाठी मी आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे वैभव नाईक यांनी सांगितले.
महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब म्हणाल्या, महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत.शिवसेना पक्ष महिलांचा नेहमीच मान सन्मान करत आला आहे . शिवसेना पक्ष महिलांना नेतृत्व करण्याची संधी देईल. चांगले काम करणाऱ्या महिलेला उद्या विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी संघटनेसाठी आणि महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम कार्यरत राहिले पाहिजे.नवीन महिलांना संघटनेत जोडले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यामध्ये कुडाळ तालुका महिला संघटकपदी दिपश्री नेरुरकर, सावंतवाडी तालुका संघटक (जि.प.आंबोली, कोलगाव) पदी श्रुतिका दळवी, वेंगुर्ले शहर संघटक कोमल सरमळकर,युवतीसेना कुडाळ तालुकाप्रमुखपदी पूजा राऊळ यांची निवड करण्यात आली. वैभव नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी दोडामार्ग उपजिल्हा संघटक विनिता घाडी,सावंतवाडी तालुका संघटक भारती कासार व नम्रता झारापकर,सावंतवाडी विधानसभा संघटक सुकन्या नरसुले,वेंगुर्ले तालुका संघटक साक्षी चमणकर,वेंगुर्ले विभागप्रमुख लक्ष्मी पेडणेकर,पिंगुळी विभाग प्रमुख निर्मला पालकर आदी उपस्थित होते.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









