कुडाळ : प.पू.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तनगंगा परिवार व दत्तमंदिर न्यास माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही बुधवार दि. १५ जुलै २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत माणगांव येथे आषाढ कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. १५ जुलै २०२६ व बुधवार दि. १६ जुलै यादिवशी ह.भ.प.वे.श्री अवधूतबुवा धुपकर यांचे ‘ अज – इंदुमती विवाह ‘ या विषयावर कीर्तन , शुक्रवार दि. १७ जुलै रोजी ह.भ.प.श्री केशवबुवा परांजपे यांचे ‘ सुभद्राहरण ‘ , शनिवार दि.१८ जुलै व रविवार दि. १९ जुलै रोजी ह.भ.प श्री दत्तात्रेयबुवा उपाध्ये यांचे ‘ रूक्मिणी स्वयंवर ‘ , सोमवार दि. २० जुलै रोजी ह.भ.प श्री सुपर्णबुवा पोखरणकर यांचे ‘ उषा – अनिरुद्ध विवाह ‘, मंगळवार दि. २१ जुलै व बुधवार दि. २२ जुलै रोजी कीर्तनकार ह.भ.प वे. श्री भास्करबुवा मुंडले यांचे ‘ दशरथ कौसल्या विवाह ‘ व ‘ च्यवन सुकन्या विवाह ‘ , गुरूवार दि. २३ जुलै व शुक्रवार दि. २४ जुलै रोजी कीर्तनकार ह.भ.प श्री महेंद्रबुवा पंतमिराशी यांचे ‘ सीता स्वयंवर ‘ , शनिवार दि.२५ जुलै व रविवार दि.२६ जुलै रोजी ह.भ.प श्री रोहनबुवा पुराणिक ‘ नल दमयंती ‘ , सोमवार २७ जुलै ह.भ.प सौ.भावज्ञाताई गावकर – ठाकुरदेसाई यांचे ‘ सुभद्राहरण ‘ या विषयावर आणि मंगळवार दि. २८ जुलै व बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी ह.भ.प श्री पुरूषोत्तमबुवा पोखरणकर यांचे ‘ वत्सलाहरण’ या विषयावर कीर्तन होऊन २९ जुलै या दिवशी आषाढ कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.
या कीर्तनांना हार्मोनियमसाथीसाठी श्री उदयराज करंबेळकर, श्री धनंजय प्रभुदेसाई , श्री माधव ओगले गुरूजी ,श्री संतोष जोशी, वे.श्री पारितोष पोखरणकर , श्री प्रद्युम्न माईणकर तसेच तबलासाथीसाठी श्री मंदार करंबेळकर, वे. श्री श्रीपाद मुंडले, श्री अमेय पटवर्धन , श्री पार्थ पटवर्धन इ. मंडळी साथसंगतसेवेसाठी असणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीतजास्त कीर्तन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कीर्तनगंगा परिवार सिंधुदुर्ग व दत्तमंदिर न्यास माणगांव यांनी केले आहे.


Subscribe










