श्री देव कुणकेश्वर मंदिरात मा.आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली पूजा

श्रावण सोमवार निमित्त प्रथम पूजेचा मान

              श्रावण महिन्यातील आज दुसऱ्या सोमवारी श्री देव कुणकेश्वर मंदिरात माजी आमदार वैभव नाईक यांना प्रथम पूजेचा मान देण्यात आला. आज पहाटे माजी आमदार वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांनी मंदिरात उपस्थित राहून   विधिवत पूजन करून आरती केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदिर समितीचे अध्यक्ष एकनाथ तेली,उपाध्यक्ष गणेश वाळके, श्री पेडणेकर उपस्थित होते.
error: Content is protected !!