
कुडाळ येथे तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न
कुडाळ तालुका काँग्रेस कमिटी बैठक प्रदेश प्रतिनिधी श्री. प्रकाश जैतापकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एम आय डीसी रेस्ट हाऊस कुडाळ येथे संपन्न झाली.
कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. अभय शिरसाट तसेच जिल्हा पदाधिकारी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी स्मार्ट मीटर बाबत आक्रमक पवित्र घेतला. या मीटिंग च्या माध्यमातून त्यांनी कुडाळ तालुक्यातील नागरिकांना आवाहन केली आहे की, ज्यांना ज्यांना स्मार्ट मीटर बाबत काही समस्या असतील दिलेल्या नंबर वर दि.१सप्टेंबर पर्यंत संपर्क करावा. त्यानंतर तालुका काँग्रेस या वतीने नागरिकांच्या समस्यांवर प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे.
यावेळी श्री प्रकाश जैतापकर प्रांतिक सदस्य, श्री विजय प्रभू जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा बँक संचालक श्री विद्याप्रसाद बांदेकर, उल्हास शिरसाट, सुंदर सावंत शहराध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष संतोष मुंज ,केतनकुमार गावडे, मंदार शिरसाट, तबरेज शेख,वैभव आजगावकर, रोहन कणेकर, मंगेश पार्सेकर, प्रीती बांदेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपर्क :- अभय शिरसाट – 73501 33444



Subscribe









