“नामस्मरण आणि भजनाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद” — युवा नेते विशाल परब

तळवडे येथे नामस्मरण चक्रीभजन महोत्सव उत्साहात संपन्न.!

तळवडे : भजनप्रेमी आणि ग्रामस्थांच्या वतीने तळवडे येथे आयोजित करण्यात आलेला नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला भाजप महाराष्ट्राचे युवा नेते श्री.विशाल परब आणि सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती श्री.गौरव मुळीक यांनी उपस्थित राहून भजनप्रेमी, ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी सदस्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या गावची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि अध्यात्मिक परंपरेची ओळख होते. तळवडे ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा भक्तिमय उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.”

रामकृष्ण हरीच्या नामघोषाने आणि पारंपरिक भजनाच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध भजन मंडळांनी सहभाग घेत भक्तीमय वातावरण निर्माण केले.

या कार्यक्रमास श्री. रुपेश राऊळ, श्री. रविंद्र काजरेकर (माजी सरपंच), श्री. आप्पा परब (तळवडे सोसायटी चेअरमन), श्री. सुनील परब (प्रमुख गावकर), श्री. शाम गावडे, श्री. काशिनाथ कुंभार, श्री. प्रमोद गावडे, श्री. राजाराम गावडे (प्रहार पत्रकार), श्री. आनंद बुगडे, श्री. सुनील सावंत (जिल्हा बँक व्यवस्थापक), श्री. चिंतामणी जाधव, श्री. रमेश परब, श्री. गजानन परब, श्री. बाळा जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते.

तळवडे ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि भक्तिभावाने पार पडलेल्या या महोत्सवामुळे गावातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक भक्तिमय झाले.

error: Content is protected !!