जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम, पणदूर येथे आज आपल्या रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आश्रमातील निराधार, अनाथ, दिव्यांग, मनोरुग्ण तसेच वृद्ध बांधवांसोबत एकत्र बसून जेवताना, त्यांच्यासोबत काही वेळ घालवताना आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य पाहताना जो आनंद आणि सुख मिळाले, त्याची कशाशीही तुलना करता येणार नाही.
आपण आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवतो; पण एखाद्या निराधार व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्या उपस्थितीने उमटलेले एक छोटंसं हास्य पाहण्यात जो आनंद आहे, तो खरोखरच अवर्णनीय आहे. ❤️
आज जाणवलं की, सेवा करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते… थोडा वेळ, दोन प्रेमाचे शब्द आणि आपुलकीने दिलेली साथसुद्धा एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचा किरण बनू शकते.
आजच्या या सुंदर आणि भावनिक क्षणी उपस्थित राहून या बांधवांसोबत प्रेमाचे काही क्षण अनुभवणारे रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, ज्येष्ठ रो. राजीव बिले, रो. गजानन कादगावकर, रो. राजू केसरकर, रो. राजन बोभाटे, रो. रवींद्र परब, रो. सचिन मदने, रो राजवर्धन देसाई,रो. अजिंक्य जमसंडेकर तसेच संविता आश्रमचे संचालक व रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सदस्य श्री. संदीपजी परब, त्यांचा संपूर्ण स्टाफ आणि आश्रमातील सर्व बांधव उपस्थित होते.
आजचा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम केवळ जेवणाचा कार्यक्रम नव्हता…
तो होता माणुसकीचा उत्सव…
आपुलकीचा अनुभव…
आणि नात्यांची जाणीव करून देणारा एक अविस्मरणीय क्षण! ❤️
रोटरीची सेवा अशीच माणसांच्या हृदयापर्यंत पोहोचत राहो… आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवत राहो. 🙏❤️
सेवा हीच खरी श्रीमंती…
आणि माणुसकी हीच खरी ओळख! 🌹
— रो. मकरंद नाईक
(अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ कुडाळ)


Subscribe










