देवगड येथील घटना
मोकाट जनावर अचानक आडवे आल्याने घडला अपघात
देवगड : नांदगाव मार्गावर जामसंडे येथील एका खाजगी हॉस्पिटल नजीक देवगडहून जामसंडेच्या दिशेने आपल्या दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर गाय आडवी आल्याने दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार मिलिंद शामराव घाडी (४०) (मूळ राहणार तळवडे) सध्या राहणार जामसंडे हा गंभीर जखमी झाला. असून त्याला उपचारासाठी तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे जाहीर केले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद हे देवगड मध्ये एका खाजगी वाहनावर चालक म्हणून गेली बरेच वर्ष कार्यरत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे आपले काम आटपून शुक्रवारी सायंकाळी दुचाकी क्रमांक MH – 07-AQ 0365 (tvs जुपिटर) घरी जात असताना जामसंडे वडांबा येथील एका खाजगी हॉस्पिटल नजीक अचानक रस्त्यामध्ये गाय आडवी आल्याने गाईला दुचाकीची जोरदार धडक बसली यावेळी दुचाकी स्वार गाडीवरून बाहेर फेकले गेले. व रस्त्यावर आपटले त्यांना गंभीर अशी दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून देवगड ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले मात्र डॉक्टर यांनी तपासणी पूर्वी ते मृत झाल्याचे घोषित केले.


Subscribe










