वालावल येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन

कुडाळ : केंद्राच्या माध्यमातून पीक नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन, मृदा परीक्षण, सेंद्रिय शेती, खत व पाणी व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच बदलत्या हवामानानुसार शेतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठीही या केंद्राची मदत होणार आहे.

कृषी माहिती केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अचूक व अद्ययावत माहिती मिळून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाचे गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी स्वागत केले असून कृषी विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तसेच या माहिती केंद्राचे आयोजन उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे , मधील मयुरेश दळवी , अजित म्हसकर , स्मित कोळेकर , मनीष कमेरिया , सोनू कुमार  आणि उज्वल तोंडवळकर या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
या वेळी सरपंच श्री. राजेश प्रभू , डॉ. उइके सर , डॉ . पालसांडे सर , तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील :- अक्षय राऊळ आणि समीर वालावलकर , कविटकर मॅडम , चंद्रकांत वालावलकर , तसेच डॉ. रविंद्र गावडे सर , आकाश मठकर , समीर चौधरी, उमा प्रभू आणि सर्व गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!