कुडाळ : आ. निलेश राणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या १० वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत नेमका काय विकास केला याची माहिती कुडाळ – मालवणच्या जनतेला द्यावी. असे प्रत्युत्तर शिवसेना पिंगुळी शाखाप्रमुख प्रसन्ना गंगावणे यांनी दिले.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांवर जाऊन फोटो काढून त्या कामांचे श्रेय स्वतः घेणे हे वैभव नाईक यांचे जुने काम असून काँग्रेसमधून शिवसेना (उबाठा) पक्षात आलेल्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नये असे देखील ते म्हणाले.
कुडाळ मालवणमध्ये आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे सुरू असून त्यांच्या कामावर जनता समाधानी आहे. वैभव नाईक यांना हे बघवत नसल्याने ते टीका करत सुटले आहेत. असे प्रत्युत्तर शिवसेना पिंगुळी शाखाप्रमुख प्रसन्ना गंगावणे माजी आमदार वैभव नाईक यांना दिले.