सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला म्हणून सूर्याची चमक कमी होत नाही

अन्यथा युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाईल

युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा थेट इशारा

कुडाळ : सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला म्हणून सूर्याची चमक कमी होत नाही; उलट ते थुंक स्वतःच्याच तोंडावर उडते! त्याचप्रमाणे आमच्या कार्यतत्पर आमदारांवर केली जाणारी बिनबुडाची टीका त्यांच्या कामाला कमी करू शकत नाही, पण टीका करणाऱ्यांचीच मानसिकता आणि वैफल्य जनतेसमोर उघडी पडते. अशी खरमरीत टीका युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी माजी आमदार वैभव नाईकांवर केली.

ज्या माजी आमदारांना जनतेने निवडणुकीत घरी बसवले, ते आज आमच्या कार्यतत्पर आमदारांवर टीका करून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. जनतेने निवडणुकीत तुमची जागा दाखवून दिल्यानंतरही अजूनही शहाणपण आलेले दिसत नाही. त्यामुळे आमच्या नेत्यांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या कार्यकाळाचा आरसा एकदा पाहावा. जनतेने तुमच्या बोलण्यापेक्षा आमच्या आमदारांच्या कामावर विश्वास ठेवला, म्हणूनच तुम्हाला पराभवाचा धक्का बसला आहे.

आजही जनतेमध्ये फिरून काम करणाऱ्या आमदारांवर टीका करून प्रसिद्धी मिळणार नाही. ज्यांना जनता नाकारते, त्यांनी किमान जनतेच्या कौलाचा तरी आदर करावा. पुन्हा आमच्या आमदारांवर टीका केल्यास युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाईल. असा इशारा देखील युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना दिला.

error: Content is protected !!