वेंगुर्ला रोड पिंगुळी पूर्णब्रह्म हॉटेल ते दर्गा या रोडच्या दुतर्फा भली मोठी सुरूची झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व ग्रामस्थांच्या सहभागातून हटवण्यात आली.
वेंगुर्ला रोड पिंगुळी पूर्णब्रह्म हॉटेल ते दर्गा रोडच्या दुतर्फा रस्त्यावर भली मोठी सुरूची झाडे सुकलेली होती दोन दिवसा पुर्वी चालत्या एका दुचाकी स्वार वर सुकलेल्या झाडाची फांदी पडली आणि दुखापत झाली. तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
यावेळी दीपक गावडे चेतन राऊळ दर्शन कुडव जावेद मुजावर घटनास्थळी उपस्थित होते. तसेच दीपक गावडे व चेतन राऊळ यांनी ही घटना बांधकाम विभाग कुडाळ चे.जे.ई बामणे साहेब यांना कॉल करून घडलेली घटना सांगितली आणि रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे तोडण्यास सांगितली. त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी झाडांची पाहणी करून तोडून घेऊयात असे आश्वासन दिले व आज रविवार सकाळी पीडब्ल्यूडी चे कर्मचारी आणि लागणारे साहित्य त्यांनी पाठविले व ती सर्व झाडे आज तोडून घेतली त्यावेळी तन्मय वालावलकर, चेतन राऊळ, दीपक गावडे, अजय आकेरकर,मंगेश चव्हाण, मंगेश मस्के, अजय बांदेकर, मयूर परब ,दत्तगुरु राऊळ, राकेश गावडे समीर मयेकर, मंदार साटम,विजय सडवेलकर, आदी उपस्थित होते..



Subscribe










