“निष्ठेचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा!”

वैभव नाईकांच्या वक्तव्यावर युवासेना तालुका प्रमुख सागर वालावलकर यांचा घणाघाती पलटवार!

आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर युवासेना कुडाळ तालुका प्रमुख सागर वालावलकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

“गद्दारीच्या कलंकाची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या राजकीय प्रवासाकडे पाहावे. निष्ठा ही केवळ भाषणातून किंवा सोशल मीडिया स्टेटमेंटमधून सिद्ध होत नाही; ती संकटाच्या काळात पक्षाच्या विचारांशी आणि कार्यकर्त्यांशी ठामपणे उभे राहण्यातून सिद्ध होते,” असा टोला सागर वालावलकर यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, “दुसऱ्यांवर गद्दारीचे आरोप करण्यापेक्षा आपल्या राजकीय कारकिर्दीचा आणि जनतेसाठी केलेल्या कामांचा हिशोब द्यावा. कुडाळ-मालवणची जनता सुज्ञ आहे. कोण किती बोलतो यापेक्षा कोण जनतेसाठी प्रत्यक्षात काय करतो, हे जनता पाहत आहे.”

“आमदार निलेशजी राणे यांच्या नेतृत्वावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या कर्तृत्वाचा हिशोब द्या. आरोपांच्या राजकारणातून बाहेर या आणि जनतेसमोर कामांची चर्चा करा,” असे आव्हानही सागर वालावलकर यांनी दिले.

शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “शिवसेना आणि युवासेनेचा प्रत्येक पदाधिकारी खोट्या आरोपांना आणि चुकीच्या वक्तव्यांना मुद्देसूद उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. आगामी काळात जनता आपल्या मतपेटीतून योग्य उत्तर देईल” अशी टीका युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी केली.

error: Content is protected !!