विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोटरीचा शैक्षणिक उपक्रम

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव येथील इयत्ता दहावीच्या ११७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’ वितरित करण्यात आले.

आधुनिक शैक्षणिक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना अधिक चांगला अभ्यास करता यावा आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रोटे. मकरंद नाईक यांनी विद्यार्थ्यांना या ॲपचा जास्तीत जास्त उपयोग करून नियमित अभ्यास करण्याचे, आपल्या गुणांमध्ये वाढ करण्याचे आणि दहावीच्या परीक्षेत उत्तम यश संपादन करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी रोटे. राजेंद्र केसरकर, रोटे. नितीन बांदेकर, रोटे. वर्षा बांदेकर मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

“तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा, मनापासून अभ्यास करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा!” 🌟📖

error: Content is protected !!