पेंडूर : माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, कोडिंग, रोबोटिक्स आणि नवोन्मेषी विचारांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ई-टिंकर लॅबचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाराव राणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या ई-टिंकर लॅबमध्ये रोबोटिक्स, कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव श्री घन:श्याम राणे ई-टिंकर लॅबचे डायरेक्टर श्री. अभिजीत सहस्रबुद्धे सर, श्री कृष्णमूर्ती सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश तावडे सर, माजी मुख्याध्यापक श्री. सुरेश परब सर, कुणकवळे केंद्राचे केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी श्री. श्रीकृष्ण सावंत सर, कट्टा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. गौरव नाईक सर, संस्थेचे पदाधिकारी श्री. अतीक शेख, श्री. सुभाष सावंत, श्री. प्रदीप सावंत, ग्रामपंचायत खरारे पेंडूर च्या, प्रभारी सरपंच सौ. परब मॅडम, ग्रामसेविका सौ. सापळे मॅडम, पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. संजय वारिक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाच्या युगासाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
“प्रयोगातून शिक्षण, तंत्रज्ञानातून नवसर्जन आणि नवसर्जनातून उज्ज्वल भविष्य” या उद्देशाने सुरू झालेली ई-टिंकर लॅब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे ई-टिंकर लॅबचे दिमाखात उद्घाटन
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106

Subscribe









