ओरोस येथे गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल १ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

२४ तासांच्या आत स्थानिक गुन्हा अन्वेषणची दुसरी कारवाई

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मागील २४ तासांच्या आत स्थानिक गुन्हा अन्वेषणने दुसरी मोठी कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई – गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची अवैध तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस जिजामाता चौक येथे सापळा रचत विरेंद्र गोविंद पटेल वय- 49 रा. लोलावत का मोहल्ला धर्कदा उदयपूर संगतडा राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(a,) (e), 81,83. तसेच भारतीय न्याय संहिता कलम 318(2),336(2)(3), 340 (2),3 (5) अनुसार कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई दिनांक 04.07.2026 रोजी दुपारी 01.45 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून या कारवाईमध्ये गोवा बनावटीची दारू 1,15,20,000/- (एक कोटी पंधरा लाख वीस हजार), तसेच गाडी टाटा सिग्मा दहा टायर 35,00,000/- आणि मोबाईल 10,000/- असा एकूण 1,50,30,000/- /-रुपये (एक कोटी पन्नास लाख तीस हजार) एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.कु.नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI हनुमंत भोसले,Psi,अनिल हाडळ, ASI सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोजा , पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिस्कर , ऋषिकेश टोपले यांनी केलेली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!