कुडाळ : ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत नेरूरपार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या विशेष उपस्थितीत हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
हे आरोग्य शिबिर वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे सकाळी ९:३० ते दुपारी १:३० या वेळेत संपन्न झाले.
विविध उपक्रम आणि मोफत वैद्यकीय सेवा:
या शिबिरात स्थानिक नागरिक आणि रुग्णांसाठी खालील वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या:
सर्वसाधारण आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
रक्त तपासणी: शुगर (साखर) आणि हिमोग्लोबिन तपासणी
रक्तदाब (BP) व मधुमेह तपासणी
छाती व श्वसन तपासणी
नेत्र तपासणी
मोफत औषध वाटप (उपलब्धतेनुसार)
आयोजक व सहकार्य:
हे आरोग्य शिबिर शुक्रतारा कला क्रीडा मंडळ (नेरूरपार), वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास (नेरूरपार), कोकण कला व शिक्षण विकास संस्था, ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा आणि आयुष्मान आरोग्य मंदिर (नेरूर क्र. २) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
या वेळी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची अत्यंत गरज असून, भविष्यातही सामाजिक हिताचे उपक्रम राबवले जातील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

नेरूरपार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न; ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद……
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107

Subscribe








