स्वातंत्र्य दिनानिमित्त वेताळ बांबर्डे येथे वृक्षारोपण

वेताळ बांबर्डे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेताळ बांबर्डे येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी गाव परिसरात सुपारी, लिंबू तसेच विविध शोभिवंत प्रजातींची एकूण १५ झाडे लावण्यात आली.

कार्यक्रमास तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप तिवरेकर, सरपंच श्रीमती वेदिका दळवी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, ओरोस येथील कृषीदूत विद्यार्थी कु. अक्षय केसकर, कु. समृद्ध भिउंगडे, कु. शिवम पाटील, कु. संदीप मोरे, कु. अथर्व पाटील व कु. कार्तिकेश चव्हाण यांनी वृक्षारोपण उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

पर्यावरणाचे संवर्धन करणे, गाव परिसर अधिक हिरवाईने समृद्ध करणे तसेच वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी उपस्थितांनी लावण्यात आलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प केला.

error: Content is protected !!