श्री देव रवळनाथ पंचायतन येथे “राजा वल्लभी अर्थात सती चंद्रभागा” हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग

तेंडोली ग्रामस्थांचे आयोजन

शहर वार्ताहर/कुडाळ

तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने श्री देव रवळनाथ पंचायतन येथे 2 जून रोजी रात्री 9 वाजता “राजा वल्लभी
अर्थात सती चंद्रभागा” हे संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दशावतार नाटकात निवडक कलाकारांचा समावेश आहे. नाटकाचे हे 29 वे वर्ष आहे.

या नाटकातील कलाकार पुढीलप्रमाणे आहेत -महागणपती – सिद्धेश वराडकर,रिद्धी-सिद्धी-दिनेश मांजरेकर,राजा वल्लभी-संजय काळे, राणी चंद्रभागा-रोशन शिरोडकर, अर्जुन-विनायक कोनकर, मेघवर्ण- प्रसाद तवटे, ऋष केतू-अक्षय सातार्डेकर, कृष्ण-गिरीश राऊळ, अनंत सारथी-साईल तळकटकर,नारद – देवेश कुडव, मारुती-निलेश नाईक, तर संगीत साथ-हार्मोनियम-संकेत कुडव, पखवाज वादक-निखिल निकम व झांज वादक-रणजीत आसोलकर यांची आहे. नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.

error: Content is protected !!