बाल हक्क संरक्षण आयोगाची सिंधुदुर्गात सुनावणी

बालकांशी संबंधित तक्रारींवर शुक्रवार 29 मे रोजी होणार चर्चा

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या वतीने बालकांसंदर्भातील प्राप्त तक्रारींचे स्थानिक स्तरावर निराकरण करण्यासाठी शुक्रवार, दि. 29 मे 2026 रोजी सिंधुदुर्ग येथे सुनावणी व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृह, प्रशासकीय इमारत, पहिला मजला येथे सकाळी 11 वाजता सुनावणी तर दुपारी 12.30 वाजता आढावा बैठक होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी दिली.

या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲङ संजय विष्णु पुराणिक, सचिव पंकज देवरे, सदस्य गितांजली बालाजी बुटी, शुभांगी संजय तांबट, संजय निळकंठराव लाखेपाटील, अतुल आनंदराव देसाई, प्रविण संजाबराव भजाडे, मिलन देवेंद्र जंगम (मिलन वसंत गुरू), तसेच आयोगामधून अजय लोंढे, उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर हेही सुनावणीस उपस्थित राहणार आहेत.

बैठकी दरम्यान आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कामगार विभाग तसेच महिला व बाल विकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून, बालकांच्या हक्कांशी संबंधित विविध तक्रारी आणि पश्नांवर चर्चा होणार आहे.

error: Content is protected !!