नवसाला पावणाऱ्या आरवलीच्या वेतोबा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात

आरवली : कोकणचा तिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.वेतोबाच्या जत्रेला केळ्यांच्या घडाची जत्रा म्हणून ओळखलं जातं

रयतेचे रक्षणकर्ता तो वेतोबा .. भक्ताच्या हाकेला धावणारा.. नवसाला पावणारा अशी श्री. देव वेतोबाची ख्याती आहे. या देवाला केळ्यांच्या घडाचा प्रसाद अर्पण केला जातो. ज्यांचे नवस बोलले जातात ते फेडण्यासाठी हजारो भाविक या जत्रोत्सवात हजेरी लावतात. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक यासह अन्य राज्यातून हजारो भाविक वेतोबा चरणी येऊन लीन होतात.

error: Content is protected !!