शाळेच्या मुख्याध्यापकांनी मानले सुनिल ठाकूर यांचे आभार
वेंगुर्ला : तंत्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन वेतोरे शाळा नंबर 2 , मठ शाळा नंबर १,२,३, आणि अडेली खुटवळवाडी शाळा अशा एकूण ५ शाळांना उद्योजक सुनिल ठाकूर आणि उद्योजक राहुल पाजरी, भावेश लिंबाचिया , संचिता सुनील ठाकूर, राजमणी विश्वकर्मा, यांच्या माध्यमातून संगणक भेट देण्यात आला. तसेच मठ हायस्कूल येथे लेझिम संच देण्यात आला. याबद्दल शाळांच्या मुख्याध्यापकांनी उद्योजक सुनिल ठाकूर यांचे कौतुक करत आभार मानले.

सुनिल ठाकूर हे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. गेली दोन वर्ष शाळांमध्ये वह्या वाटपाचा उपक्रम ते राबवला आहे. यामध्ये त्यांना पुरुषोत्तम परब, तुषार मठकर, राहुल पाजरी, सागर ठाकूर यांचे सहकार्य लाभले आहे. आजवर जिल्ह्यातील अनेक तरुणांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे होण्यासाठी उद्योग क्षेत्रात सहाय्य केले आहे. यावेळी देखील शाळांना संगणक प्रदान केल्याने अनेक विद्यार्थी या संगणकाचा लाभ घेत आहेत.
सुनिल ठाकूर यांच्या या कार्याचे सिंधु दर्पण टीम कडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!














