कणकवली : बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग शाखा, महिला शाखा, कणकवली शाखा, समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने सोनगेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, तालुकाध्यक्ष भाई जाधव, संस्कार विभागाचे सचिव संजय कांबळे, कोषाध्यक्ष महेंद्र कदम, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, जनीकुमार कांबळे, विजय नेमळेकर, विजय हरकुळकर, संदीप पेंडुरकर, प्रवीण कदम, गुणाजी जाधव, उत्तम हळवलकर, रजनी कासार्डेकर, रविना कांबळे, सुनीता कांबळे, क्राती पवार आदी उपस्थित होते.
आरंभी आनंद कासार्डेकर, सुषमा हरकुळकर, भाई जाधव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख दिलीप तरंदळेकर यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बबासाहेब आंबेडकर पर्यंत रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बौद्ध बांधवांनी अभिवादन केले. जयंती उत्सवाला नगराध्यक्ष संदेश पारकर, नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेविका दीपिका जाधव, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण जाधव आदी यांनी उपस्थित लावून डॉ. आंबेडकर जयंतीच्या उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात अरुण जाधव यांना समता सैनिक दलामध्ये जिल्ह््यात प्रथमच मेजर ही पदवी मिळल्याबद्दल सन्मान करण्यात आला. डॉ. आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनप्रसावर सुचिता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विलास वळंजू यांनी केले. आभार अपूर्वा पवार यांनी मानले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सदस्य आणि बौद्ध बांधव उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी
1
/
109
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
1
/
109

Subscribe









