कुडाळ सांगिर्डेवाडी येथील नगरपंचायतीच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीची आमदार निलेश राणे यांनी केली पाहणी

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ सांगिर्डेवाडी येथील नगरपंचायतीच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीची पाहणी आमदार निलेश राणे यांनी आज गुरुवारी केली यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना कडक भाषेत सूचना दिल्या आणि कामांमध्ये सुधारणा करा असे सांगितले.

कुडाळ नगरपंचायतीचा कचरा डेपो सांगिर्डेवाडी येथे आहे या डेपोला काल बुधवारी सायंकाळच्या वेळेला आग लागली आणि या आगीचा धूर सर्वत्र पसरला आग विझवण्यासाठी 12 वेळा अग्निशामक दलाच्या वाहनामध्ये पाणी भरून ही आग दोन दिवस विजवावी लागली. ही घटना समजल्यानंतर आज गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी कचरा डेपो ला भेट दिली यावेळी त्यांनी खडे बोल सुनावले आम्ही सातत्याने मेहनत घेत आहोत आणि अशा प्रकारे कचरा विस्कळीत टाकणं बरोबर दिसत नाही त्यामुळे नागरिकांचा रोष वाढतो अनेक विकास कामांची यादी आहे काही विकास कामांना रकमा कोट्यावधी रुपयांमध्ये आले आहेत मात्र त्याचे प्रत्यक्षात काम का सुरू झाली नाही असे खडे बोल सुनावले यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही असे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना त्यांनी सांगितले सर्व नगरसेवकांना घेऊन एकत्र बैठक घ्या आणि राहिलेल्या कामांचा आढावा घ्या ती लवकरात लवकर कशी होती ते पहा असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते काका कुडाळकर उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक विलास कुडाळकर, शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक राजीव कुडाळकर, निलेश परब, नगरसेविका संध्या तेरसे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!