पद असो वा नसो, जनसेवेचे व्रत अखंड सुरु ठेवणार – परशुराम उपरकर

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन

कणकवली : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना पक्षात प्रामाणिक आणि एकनिष्ठेने काम करत आलो. शिवसेना पुन्हा नव्या दमाने सिंधुदुर्गासह कोकणात उभी राहिल. त्यासाठी आपण सर्वांनी काम करुयात. माझ्या वाढदिवसानिमित्त असंख्य शुभेच्छा दिलात. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. या पुढील काळात सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून जनतेचे प्रश्न घेवून आपण लढत राहणार आहोत. जिल्ह्याचा प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आपण सर्वांनी काम करुयात, पद असो वा नसो, जनसेवेचे व्रत अखंड सुरु ठेवणार असल्याचे प्रतिपादन ठाकरे शिवसेना नेते, माजी आ. परशुराम उपरकर यांनी केले.

कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे माजी आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी माजी आ. वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, परशुराम उपरकर यांची पत्नी प्रणाली उपरकर, मुलगी पूर्वजा, मुलगा प्रणव, प्रथमेश सावंत, अनिल राणे, संतोष सावंत, विलास गुडेकर यांच्यासह उपरकर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

error: Content is protected !!