खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक येथे गणेश याग व 100 ज्येष्ठांचा भव्य सत्कार सोहळा

जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत व जि. प. सदस्य मनोज रावराणे यांच्यामार्फत आयोजन

कणकवली : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री,खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक विभागामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 9 एप्रिल रोजी हरकुळ खुर्द येथील श्री शृंगेश्वर गणपती मंदिरात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ‘गणेश याग’ने होणार असून, त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ७५ वर्षांवरील १०० ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान समारंभ दुपारी १२ वाजता पार पडणार आहे. तसेच दुपारी 1 ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री 9 वाजता पारंपरिक दशावतारी नाटक सादर करून सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन हरकुळ बुद्रुक विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले असून, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या प्रमुख पुढाकारातून कार्यक्रम पार पडणार आहे.
नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणच्या विकासाला नवे बळ मिळाले असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा आणि संस्कृती जपण्याचा संदेश दिला जात आहे.

error: Content is protected !!