गणेशोत्सवापूर्वी माणगाव मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी

जि. प. सदस्य रुपेश कानडेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

योगिता कानडे /कुडाळ : कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवापूर्वी माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य (माणगाव) रुपेश रजनी रवींद्र कानडे यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री व मत्स्य-बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माणगाव मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवात नागरिकांना व चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागू नये यासाठी हे रस्ते सुस्थितीत करणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी खालील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीची यादी पालकमंत्र्यांना सादर केली आहे :

झाराप तिठा उड्डाणपूल शेजारील सर्व्हिस रस्ते

MDR 43 बांबर्डे रेल्वेस्टेशन रस्ता (0/00 km ते 0/1500 km)

आकेरी-माणगाव रस्त्यावर बांधण्यात आलेल्या नवीन लहान पुलावरील खड्डे

आकेरी-माणगाव शिवापूर रस्त्यावरील खड्डे

पुढील महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी प्रशासकीय स्तरावरून तातडीने हालचाली करून हे सर्व रस्ते सुस्थितीत आणावेत आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

error: Content is protected !!