गावच्या स्वागत नाक्यावर आकर्षक सेल्फी पॉईंट ठरतोय लक्षवेधी
कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील गावच्या स्वागत नाक्यावर वेतोबा क्रिकेट क्लब व पावणाई टेम्ब राधा नृत्य मंडळ यांच्या कल्पनेतून आकर्षक सेल्फि पॉईंट उभारण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वेंगुर्ला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कुडाळ नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता शिरवलकर,भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. 7 एप्रिल 2026 रोजी पार पडला.यावेळी निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच शैलेश घाटकर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ग्राम समितीचे अध्यक्ष प्रसाद गावडे, उपाध्यक्ष आनंद भोगले, ग्रामपंचायत सदस्य साजुराम नाईक, दशरथ कदम,डॉ राजन राणे, कानू शेळके, दिपक खरात, ग्रामपंचायत अधिकारी शालिनी कोकरे यासंह वेतोबा क्रिकेट क्लबचे सदस्य व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व आदिशक्ती अभियानात केलेली कामगिरी कौतुकास्पद असून गावची एकी गावची खरी ताकद असल्याचे गौरवोउद्गार सभापती मिलिंद नाईक यांनी व्यक्त केले. तर ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात केलेल्या सुधारणा व बदल संपूर्ण जिल्ह्यात लक्षणीय व चर्चेत असल्याचे कुडाळ गटविकास अधिकारी वालावलकर यांनी गौरवोउद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत सामंत व प्रदीप गावडे यांनी केले तर आभार प्रसाद गावडे यांनी मांडले.


Subscribe










