पराभवाच्या नैराश्यातून आणि आमदार निलेश राणे यांची वाढती लोकप्रियता यामुळे उफळलेली ही केवळ पोटदुखी !
कट्टर राणे समर्थक चंदन शरद कांबळी यांचे प्रत्युत्तर
कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने नाकारलेले माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेशजी राणे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत हास्यास्पद आणि त्यांच्या पराभवाच्या नैराश्यातून आलेले आहेत. ज्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी नेहमीच धरसोडीचे राजकारण केले, त्यांनी आम्हाला निष्ठेचे डोस पाजू नयेत.
वैभव नाईक यांनी खालील गोष्टींचे आत्मपरीक्षण करावे असे प्रत्युत्तर राणे समर्थक चंदन कांबळी यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना दिले.
- पक्षांतराची लाचारी कुणाची होती? आमदार निलेश राणे यांनी केलेला गौप्यस्फोट शंभर टक्के सत्य आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे तिकीट मिळवण्यासाठी आणि स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी वैभव नाईक स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात होते आणि धनुष्यबाण चिन्हावर लढण्यास उत्सुक होते. आज पराभव झाल्यानंतर ‘गद्दारी नको होती’ अशी वार्ता करणे म्हणजे सरळ सरळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे आहे.
- जनतेचा कौल स्वीकारा: कुडाळ-मालवणच्या जनतेने वैभव नाईक यांच्या निष्क्रियतेला कंटाळून त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. आमदार निलेश राणे साहेब हे जनतेच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या हक्काच्या ७ ते ८ हजार मतांच्या अधिकृत फरकाने विजयी झाले आहेत. लोकशाहीत मताधिक्य कितीही असो, विजय हा विजयच असतो.
- नेतृत्वावर टीका करण्याची पात्रता नाही: केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि महायुतीचे असंख्य कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांमुळे आणि अहोरात्र मेहनतीमुळे हा विजय मिळाला आहे. याउलट, वैभव नाईक यांच्याकडे ना स्वतःची कामे दाखवण्यासारखी होती, ना जनतेचा विश्वास.
- विकासकामांवर बोला: निलेश राणे साहेब आमदार झाल्यापासून सिंधुदुर्गात विकासाचा धडाका सुरू आहे. दोन वर्षांत काय काम केले, असे विचारण्यापूर्वी नाईक यांनी स्वतःच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील निष्क्रियतेचे हिशोब जनतेला द्यावेत.
वैभव नाईक यांनी निलेश राणे साहेबांवर किंवा महायुतीच्या नेत्यांवर तथ्यहीन टीका करणे थांबवावे. जनतेने तुम्हाला नाकारले आहे, आता शांत बसा आणि निलेश राणे साहेब आणि संपूर्ण राणे परिवार कोकणचा विकास कसा करतात ते उघड्या डोळ्यांनी बघा असे प्रत्युत्तर चंदन शरद कांबळी यांनी वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेला दिले.


Subscribe









