शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कुडाळ पोलिसांना निवेदन
कुडाळ : संभाजी भिडे गुरुजींवर व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून टिप्पणी करणाऱ्या इसमावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने श्रीकृष्ण शिरोडकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.
या निवेदनात म्हटल्याप्रमाणे डिगस गावच्या श्री. काळंबा देवी प्रसन्न या ग्रुपवर गावात होणारे सण, खेळ, स्पर्धा इत्यादींची माहिती पाठवली जाते. त्याचप्रमाणे १८ फेब्रुवारी ते १९ मार्च म्हणजेच फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत हिंदवी साम्राज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदिचे गाळू या ठिकाणी जमून अंदरांजली वाहिली जाते. याबाबत दिनांक १७ फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण शिरोडकर यांनी श्री. काळंबा देवी प्रसन्न या व्हॉट्सॲप ग्रुपवर आवाहन केले असता या व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य असणाऱ्या हेमंत जनार्दन दिगसकर यांनी शिरोडकर यांच्या मेसेजला उत्तर देत संभाजी भिडे गुरुजी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूजनाच्या विरोधात उत्तरे देण्यास सुरुवात केली. यावेळी शिरोडकर यांनी माझ्या मेसेजला तुम्ही उत्तरे देऊ नका अशी विनंती केली असता “भिडे गुरुजींना कायद्याने उत्तर देतो” अशी धमकी दिली. याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने श्रीकृष्ण पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित इसमावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत संबंधित दिगसकर या व्यक्तीला समक्ष बोलावून योग्य ती समज दिली जाईल असे आश्वासन कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिले आहे.



Subscribe










