दोन वर्षात स्पर्धा परीक्षांमधून एकूण ५ पदांवर निवड,अभिमानास्पद कामगिरी
कुडाळ येथील कु प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार MPSC मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पदावर निवड झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्ह्यातून यशस्वी झालेलीएकमेव महिला उमेदवार ठरली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागीय कार्यालय सिंधुदुर्ग नगरी याठिकाणी तिची पहिली नेमणूक झाली आहे.
कु प्राजक्ता हिचे १२वी पर्यंत शिक्षण कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे झाले.त्यानंतर KIT कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कोल्हापूर येथून B E Civil प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.
स्पर्धा परीक्षांमधून प्रशासकीय सेवेत जाण्याच्या हेतूने पुढील तयारीसाठी पुणे येथे २ वर्षे MPSC चा अभ्यास केला.
त्या अभ्यासाच्या जोरावरच गेल्या वर्षी एकूण ४ पदांवर तिची निवड झाली होती.
कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि प सिंधुदुर्ग येथे ती गेल्या वर्षी पासून कार्यरत आहे.याच बरोबर कनिष्ठ अभियंता जि प रत्नागिरी, भूमि अभिलेख विभाग व स्थापत्य अभियंता सहाय्यक या पदांवर देखील तिची निवड झाली होती.नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सेवांतर्गत परीक्षेमध्ये सुद्धा विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.
स्पर्धा परीक्षा मधील आपल्या प्रवासाबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणते की योग्य मार्गदर्शन नियमित सराव आणि अभ्यासातील सातत्य यामध्येच यशाचे गमक आहे. दररोज 12 ते 14 तास अभ्यास, आधीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव, मुलाखतीसाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि याचबरोबर स्पर्धा परीक्षांच्या या खडतर प्रवासात प्रत्येक टप्प्यावर घरच्यांची मिळालेली भक्कम साथ यामुळेच हे यश मिळवणे शक्य झाले.
दहावी बारावी मध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असणारा सिंधुदुर्ग जिल्हा अजूनही मात्र स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात मात्र थोडा पिछाडीवर आहे. मुलाखती वेळी याचा आलेला अनुभव सांगताना प्राजक्ता म्हणते की यावेळी एमपीएससी भवन येथे कागदपत्र पडताळणीसाठी असलेल्या अधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पत्ता ऐकून मॅडम आपण फारच दुर्मिळ जिल्ह्यातून आलात , तुमची निवड झालीच समजा असे म्हटल्यावर एका बाजूला आनंदही झाला मात्र त्याचवेळी स्पर्धा परीक्षेत सिंधुदुर्गाचे असणारे स्थान बघून खंत ही वाटली. पहिली पोस्टिंग ही सिंधुदुर्गात झाल्यामुळे आता स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना शक्य ती सर्व मदत जिल्ह्यातीलच नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्याचा मानस प्राजक्ता हिने व्यक्त केला.
या सर्व यशामागे आई वडील श्री राजाराम गवाणकर,सौ राणी गवाणकर ,भाऊ डॉ राहुल गवाणकर,वहिनी सौ तन्वी गवाणकर,सर्व गवाणकर कुटुंबीय,भाऊजी डॉ वैभव विधाते(उपायुक्त पनवेल मनपा) तसेच अभ्यासिकेपासून सोबत असणारे व आता अधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री उमेश नेरुरकर,श्री स्वप्नील होडावडेकर ,श्री रोहित पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमीच मिळाल्याचे आवर्जून सांगितले .तसेच
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील कार्यकारी अभियंता श्री सुदेश राणे सर,शाखा अभियंता वाळके सर व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व अधीकारी ,कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य मुलाखतीच्या टप्प्यावर मिळाले.
यापुढेही आपल्या तांत्रिक ज्ञानाचा व मिळालेल्या पदाचा उपयोग हा नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तसेच पारदर्शक प्रशासकीय सेवेसाठी करणार असल्याचे सांगितले .


Subscribe









