वेताळ बांबर्डे पुलनजिक अपघात

कार रस्त्याच्या कडेला कोसळली

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्ग वर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला कोसळल्याची घटना आज पहाटे सुमारे ६.४५ वाजता घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

माहितीनुसार, वेताळ बांबर्डे पुलानजिक गोडकर कुटुंबियांच्या घरासमोर महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. हा रस्ता अत्यंत अरुंद असून वाहनचालकांना योग्य अंदाज न आल्याने येथे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. स्थानिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनाचे लक्ष या धोकादायक ठिकाणी वेधले असले तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः गोडकर कुटुंबीय, सतत भीतीच्या छायेखाली जीवन व्यतीत करत आहेत.

आजच्या घटनेतही महामार्गाचा अंदाज न आल्याने कार रस्त्याच्या कडेला घसरली. वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक सुरक्षित असल्याचे समजते. स्थानिकांकडून या ठिकाणी तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी आहे.

error: Content is protected !!