भूखंड वाटपात मोठा घोटाळा ;स्थानिक ग्रामस्थांचा आरोप
मा.आ.वैभव नाईक,स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला जाब
कुडाळ एमआयडीसी मधील भूखंड राजस्थानी परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिर बांधण्यासाठी देण्यात आला असून त्या परप्रांतीय व्यक्तीने त्याठिकाणी उत्खनन केले आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीचे अधिकारी अविनाश रेवणकर यांच्या कार्यालयात धडक देत याचा जाब विचारला. उद्योग व कारखान्यासाठी द्यावयाचे भूखंड मंगल कार्यालयासाठी दिले जात असल्याने भूखंड वाटपात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी अविनाश रेवणकर यांनी हा भूखंड अद्याप वाटप केलेला नाही असे सांगितले. भूखंड वाटप केलेला नसेल तर त्या जमिनीत उत्खनन कसे काय करण्यात आले? असा सवाल वैभव नाईक व ग्रामस्थांनी विचारला. त्यावर अविनाश रेवणकर यांनी उत्खनना बाबत माहिती नसल्याचे सांगताच. याची शहानिशा करण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष त्या भूखंडाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली. तर त्याठिकाणी उत्खनन झाले असल्याचे दिसून आल्याने एमआयडीसी अधिकाऱ्यांना पुन्हा धारेवर धरण्यात आले. तसेच अवैध उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित परप्रांतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी वैभव नाईक व ग्रामस्थांनी यावेळी लावून धरल्याने शासकीय जमिनीवर अवैध उत्खनन केल्याची तक्रार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मंडल अधिकारी प्रशांत मसुरकर यांच्याकडे दिली आहे.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ म्हणाले, एमआयडीसीच्या स्थापनेवेळी जमीन हस्तांतरित करताना स्थानिक जमीन मालकांना प्रति गुंठ्याला ४२ रु चा भाव देण्यात आला होता. याठिकाणी उद्योग आणि कारखाने येणार म्हणून जमीन मालकांनी जमीन दिली परंतु, आता हीच जमीन परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिर बांधण्यासाठी दिली जात असेल तर त्याला आमचा विरोध आहे. ४ सप्टेंबर रोजी या भूखंडावर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे असे सांगण्यात येत आहे. तसे झाले तर हा कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी एमआयडीसीचे रत्नागिरी एरिया मॅनेजर संजय कसबे, मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख कृष्णा धुरी,काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विजय प्रभू, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, अतुल बंगे, योगेश धुरी, सुशील चिंदरकर,अमित राणे, गुरु गडकर, अजित मार्गी, प्रभाकर गावडे, दीपक गावडे, रामा कांबळी, स्वप्निल गावडे, महेश गावडे, केदार गावडे, भूषण गावडे, कृष्णा मराठे, राजन धोंड, विनय गावडे, बाबी आळवे, श्रीधर कोरजुवेलर, प्रथमेश गावडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
109
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
1
/
109


Subscribe









